जिल्ह्यातील ‘त्या’ उपसरपंचावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- संगमनेर खुर्दच्या महिला तलाठ्यास वारस नोंदीच्या कारणावरुन रस्त्यात अडवून शिवीगाळ आणि अश्लिल हावभाव करणारा उपसरपंच गणेश साहेबराव शिंदे याच्यावर शहर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

मंगळवारी दुपारी महिला तलाठी दुचाकीवरून जात होत्या. शिंदेने त्यांना आवाज देत थांबवले. कामाची विचारणा करत वाद घातला. दुचाकीची चावी काढून अश्लिल शिवीगाळ करत हावभाव करत कागदपत्रे भिरकावले. या घटनेचा निषेध केला जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24