अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-आपल्या कॅबिनमध्ये खुर्चीच्या पाठीमागे बेकायदेशीरपणे राजमुद्रा लावल्याने साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी आपल्या कॅबिनमध्ये खुर्चीच्या मागे राजमुद्रा लावली असून राजमुद्रा वापरण्याचा अधिकार राष्ट्रपती, राज्यपाल,
तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे न्यायदानाचे काम करतात त्यांनाच हा राजमुद्रा वापरण्याचा अधिकार आहे. परंतु साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे माहितीच्या अधिकारात विचारले असता
अशाप्रकारे राजमुद्रा लावण्यासाठी त्यांच्याकडे असलेला शासन निर्णय व शासनाची परवानगी असल्याबाबतचा दस्त असेल तर ताबडतोब मिळावा म्हणून संजय काळे यांनी माहिती अधिकारात विचारले होते.
मात्र अशाप्रकारचा कोणताही दस्त उपलब्ध नाही. यासंदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून बगाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी काळे यांनी केली आहे.