अखेर बाळासाहेब थोरातांनी घेतला पुढाकार ! संगमनेरच्या वैभवात पडणार भर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- संगमनेर तालुक्यात वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र आरटीओ कार्यालय श्रीरामपूरला असल्याने संगमनेर-अकोले-राजूरच्या वाहन धारकांना ते दूरचे आहे.

संगमनेर मध्यवर्ती ठिकाण असल्याने दोन तालुक्यातून संगमनेरात आरटीओ कार्यालय व्हावे, अशी मागणी वाढल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत लवकर प्रस्ताव सादर होणार आहे.

मंत्री थोरात यांच्या मंत्रालयातील कार्यालयात या बाबत परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढोकणे व परिवहन विभागाचे अधिकारी यांची बैठक झाली.

संगमनेर परिवहन कार्यालय व वाहन तपासणी ट्रेकसाठी आवश्यक जागा उपलब्ध करुन देऊ, असे मंत्री थोरात यांनी बैठकीत सांगितले. यामुळे कार्यालयाच्या कामाला गती आली आहे.

तातडीने प्रस्ताव सादर करुन दर आठवड्याला संगमनेरमध्ये शिबिर आयोजित करण्याचे आदेश मंत्री अनिल परब यांनी परिवहन विभागाला दिले आहे. आरटीओ कार्यालयामुळे संगमनेरच्या वैभवात भर पडणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24