अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- दोन महिन्यांच्या आजारपणानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी कामाला सुरुवात केली आहे. येत्या १ जून रोजी ते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेवून केलेल्या कामांचा आढावा घेणार आहेत. दरम्यान शरद पवार यानी काल सायंकाळीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याची वर्षा निवासस्थानी जावून सुमारे पाऊण तास चर्चा केली.
या चर्चेचा तपशील अधिकृतपणे सांगण्यात आला नसला तरी त्याबाबत माध्यमांतून काही माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांत राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणाकडून केल्या जाणाऱ्या कारवाई संदर्भात पवार यांच्याशी मुख्यमंत्र्याची चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंत्र्यांच्या बैठकीनंतर ते राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. मागील काळात धनंजय मुंडे याच्यावर त्यांच्या तिसऱ्या पत्नीने आरोप केले होते.
तर राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप झाल्याने राष्ट्रवादी आणि महविकास आघाडी अडचणीत आली होती या पार्श्वभुमीवर रिक्त मंत्र्याची पदे भरण्याबाबत जुलै महिन्यात अधिवेशनापूर्वी पक्षाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या करीता या आढावा बैठका महत्वाच्या आहेत.