अखेर ‘ती’ स्कूल बस नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी सापडली!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  अलीकडे चोरट्यांना कोणत्या वस्तूची चोरी करावी याचे ताळतंत्र राहिले नाही. नुकताच काही तरूणांनी गावी जाण्यासाठी चक्क एसटी बस चोरल्याची घटना घडली होती.

आता तर थेट स्कूल बसचीच चोरी केली होती. ठाणे जिल्ह्यातुन चोरलेली एक स्कूल बस शेवगाव तालुक्यात सापडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथून बुधवारी पहाटे एक स्कूल बस चोरट्यांनी चोरुन त्या बससह चोरटे नगरच्या दिशेने पळून गेल्याचे त्या परिसरातील पोलिस निरीक्षक कोचरे यांनी अहमदनगर पोलिसांना कळवले होते.

या माहितीच्या आधारे नगर जिल्ह्यातील सर्व प्रमुखांना याबाबत सतर्क करण्यात आले होते. त्यानुसार शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे हे देखील या मोहिमेत सहभागी झाले होते.

त्यांनी शेवगावचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांना ही जबाबदारी दिली होती. त्यानुसार सदरची स्कूल बस नेवासा रस्त्यावरील त्रिमुर्ती कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या पटांगणात उभी असल्याची माहिती पो.नि.गोरे यांना गुप्त खबऱ्याने दिली.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी या ठिकाणी छापा टाकला, मात्र पोलिसांची चाहूल लागताच चोरटे बस सोडून पसार झाले.

शेवगाव पोलिसांनी ही ताब्यात घेतली आहे. या कारवाईत पो.कॉ.वसंत फुलमाळी, कैलास पवार, नारायण बडे, संदीप बर्डे यांनी सहभाग घेतला.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24