Maharashtra : अखेर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार ! कसा ठरला फॉर्म्युला, 40-60? की 50-50?

Maharashtra : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन काही महिने उलटले आहेत तरीही राज्यातील सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामळे महाराष्ट्रातील जनतेचे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागलेले आहे. लवकरच राज्यातील सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

येत्या १२ आणि १३ डिसेंबरला राज्य सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यामध्ये १८ मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

लवकरच राज्य सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. या मंत्रिमंडळ विस्तारात किती मंत्र्यांना शपथ दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटातील बरेच आमदार पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र आता या मंत्रिमंडळ विस्तारात किती आमदारांना मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात सरकारचा फॉर्म्युला कसा ठरला आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शिंदे गटाला किती मंत्रिपद मिळणार? तसेच भाजप मंत्रिपदाचा फॉर्म्युला कसा ठरवणार हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजप-शिंदे 60-40 टक्के या फॉर्म्युल्याने मंत्रिमंडळ विस्तार करणार की 50-50 या फॉर्म्युल्याने मंत्रिमंडळ विस्तार करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाराज आमदारांची नाराजी दूर होणार का? किंवा नाराज आमदारांना मंत्रिपद न मिळाल्याने पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.