ताज्या बातम्या

7th Pay Commission : अखेर सरकारने घेतला मोठा निर्णय! ‘या’ दिवशी खात्यात येणार पैसे

Published by
Ahmednagarlive24 Office

7th Pay Commission : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण या कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच महागाई भत्त्यात वाढीसह 18 महिन्यांची डीए थकबाकीचे पैसे जमा होणार आहेत. 

त्यामुळे कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जर सरकारने हा निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. याबाबत सरकारनेही मोठे वक्तव्य केले आहे.

सरकार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ करू शकते, अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि 18 महिन्यांच्या डीए थकबाकीचे पैसे खात्यात जमा करता येतील. सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु,नवीन वर्षात हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारने दिली माहिती

सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक 18 महिन्यांच्या डीएच्या थकबाकीची आतुरतेने वाट पाहत आहेत, याबाबत सरकारने आता एक मोठी माहिती शेअर केली आहे.

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांचे 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 रोजीचे DA चे तीन हप्ते कोरोना विषाणूमुळे थांबवले आहे. या काळात सरकारवर मोठा आर्थिक दबाव आला होता त्यामुळे दबाव कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता.

आर्थिक वर्ष 2020-21 साठी निधीच्या उद्देशाने थकबाकी DA/DR जारी करणे योग्य मानले नाही. तसेच 18 महिन्यांचा थकबाकी डीए भरणे शक्य होईल असे मानले जात आहे. याबाबत सरकारने अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही.

इतकी होणार वाढ

सरकार नवीन वर्षाच्या म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही घोषणा करू शकते, जी जुलै 2022 पासून लागू मानली जाईल. सरकारने डीए 4 टक्क्यांनी वाढवला तर तो 38 वरून 42 टक्क्यांवर जाईल. त्यामुळे पगारात खूप वाढ होईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office