अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. राज्याचा एकूण निकाल 99 .95 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असून राज्यात मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे तर मुलांचा निकाल 99.94 आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी याबाबत आज माहिती दिली. सन 2020-21 वर्षातील एसएससी (इ. 10 वी ) परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे.
यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
विभागिय मंडळ निहाय निकाल
परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या