अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार असून, २८ फेब्रवारी रोजी हे अधिवेशन सुरू होणार आहेत.(budget session)
याबाबतची घोषणा आज राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेतले जावे, अशी मागणी जोर धरत आहे.
यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर ऐवजी मुंबईतहोत असल्याने ही मागणी सातत्याने होत होती. विधिमंडळ कामकाज समितीची पहिली बैठक आज पार पडली.
या बैठकीत आगामी अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली. राज्य सरकार सत्तेवर आल्यापासून अधिवेशन नागपुरात होत नसल्याने विरोधी पक्ष नेत्यांकडून टीकाटिप्पणी सुरू होती.
शिवाय काँग्रेसकडूनही नागपुरात अधिवेशन व्हावे, अशी मागणी केली गेली. अखेर ही मागणी आता मान्य झाली आहे. त्यामुळे राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २८ फेब्रवारी रोजी नागपुरात सुरुवात होणार आहे.