अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-फेब्रुवारी ते मे 2020 या कालावधीत राज्यात झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते.
आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरश वाया गेली होती. यामुळे बळीराजाची मोठी आर्थिक हानी झाली होती. दरम्यान या नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत वाटप करण्यासाठी 247 कोटी 76 लाख 52 हजार रूपयांचा निधी विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
यात नगर जिल्ह्यातील बाधित शेतकर्यांना 4 कोटी 28 लाख 23 हजार रूपयांचा समावेश आहे. या कालावधीत नगर जिल्ह्यात 2709 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.
दरम्यान बाधित शेतकर्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. यामुळे बाधित शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.