अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- कोरोनामुळे कटिंग सलूनचे दुकान एक महिन्यापासून बंद असल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना महामारीने सर्वसामान्य माणसांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. सार्वजनिक उपक्रम, नात्यागोत्याचा भेटीगाठी आणि जवळच्या माणसांच्या प्रत्येक जण दूर झालेला आहे.
खर्डा व परिसरातील कटिंग, सलूनची दुकाने गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत, त्यामुळे नाभिक समाजातील अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील वर्षाच्या कोरोना लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.
त्यामुळे कटींगसह इतर दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अशा कठीण परिस्थितीत संसाराचा गाडा हाकत असताना अनंत अडचणी येत आहेत.
इतरांप्रमाणे सलूनच्या दुकानांना ठराविक वेळी कोरोनाचे नियम पाळून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी नाही तर आम्हाला रोख स्वरूपात शासनाने अनुदान दयावे अशी मागणी आता होत आहे.