जिल्हाधिकऱ्यांच्या आदेशानंतरही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक सुरूच

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खाजगी हॉस्पिटल शासन नियम डावलत असुन कुठल्याही प्रकारे शासन नियम दराप्रमाणे बिले दिली

गेली जात नसल्यामुळें रुग्णांना पुन्हा लाखों रुपयांची बिले हे सर्व सामान्य जनतेला भरावी लागत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे.

याबाबत नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी डॉक्टरांना शासन नियमांप्रमाणे वीजबिले आकारण्यात यावी असे आदेश दिले होते. मात्र हे नियम खासगी रुग्णालये पायदळी तुतडवीत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांसाठी पुरेसे बेड उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपयांची बिले वसूल केली जात आहेत. आधी ५० जे ७० हजार रुपये ॲडव्हान्स भरा, मगच उपचार सुरू होतील,

असे नातेवाइकांना सांगितले जात आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. मंगळवारी दिवसभरात २ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हाभरातून रुग्ण नगर शहरातील रुग्णालयांत दाखल होत आहेत.

महापालिकेने शहरातील ३१ खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. खासगी रुग्णालयांना प्रथमदर्शनी भागात दरफलक व बेड उपलब्धतेबाबतचा फलक लावणे बंधनकारक आहे.

हे फलक रुग्णालयात लावले आहेत किंवा नाही, कुठल्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत. त्यापैकी ऑक्सिजनचे किती, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे.

असे असतानाही रुग्णालयांकडून दरफलक तर दूरच, पण त्यांच्याकडे किती बेड शिल्लक आहेत, याची माहितीदेखील दिली जात नाही. रुग्णांना गरज पडल्यास कुणाकडे संपर्क करायचा, याचीही कोणतीही सोय महापालिकेने केलेली नाही.

महापालिकेचा वचक नसल्याने खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा दर आकारत असून, ५० जे ७० हजार रुपये भरून घेतल्याशिवाय रुग्णांवर उपचार सुरू केले जात नाहीत. असे चित्र सध्या जिल्ह्यात सुरु आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24