जाणुन घ्या पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज (3 जानेवारी) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. 2022 च्या तिसऱ्या दिवशीही इंधनांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.(Petrol Diesel Price Today)

जवळपास दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी सलग 61 व्या दिवशी इंधनाच्या दरात बदल केलेला नाही.

आजही पेट्रोलचे दर जैसे थेच आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 03 नोव्हेंबर रोजी उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 109.98 रुपये तर डिझेलचा दर 94.14 रुपये प्रतिलिटर आहे.

कोलकात्यात पेट्रोलची किंमत 104.67 रुपये आहे तर डिझेलची किंमत 89.79 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साइज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.

पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात.

इंडियन ऑइलचे ग्राहक RSP सोबत सिटी कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL चे ग्राहक RSP 9223112222 वर लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HP Price पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.