ताज्या बातम्या

बॅंकेची कामे उरकून घ्या…४ दिवस बॅंका राहणार बंद

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Maharashtra News :-आर्थिक व्यवहार म्हंटले बँकेत जाणे आलेच यातच एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. जर का तुमची बॅंकेची काही कामे राहिले असतील तर ती लवकर आटपून घ्या कारण कारण २६ मार्चपासून सलग ४ दिवस बॅंका बंद राहणार आहेत.

केंद्र सरकारचे कामगार कायदे आणि खासगीकरणाला विरोध करण्यासाठी देशभरातील कामगार संघटनांनी दोन दिवसीय राष्ट्रीय संपाची हाक दिली आहे.

येत्या २८ आणि २९ मार्च रोजी हा संप होणार आहे. दरम्यान या संपापूर्वी शनिवार २६ मार्च रोजी चौथा शनिवार असल्यानं सलग चार दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे.

यामुळे ग्राहकांना गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत बँकेची कामे उरकावी लागतील. दरम्यान, एसबीआयने मात्र आपण संपाच्या काळात सारे व्यवहार सुरळीत राहतील याची सोय केलेली आहे असं म्हटलं आहे.

पण संपामुळे काही प्रमाणात कामाला फटका बसू शकतो. तसेच एप्रिल २०२२ महिन्यात यंदा अनेक सण आल्याने पुढील महिन्यातही अनेक दिवस बॅंकांचे व्यवहार विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.

Ahmednagarlive24 Office