अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यात देखील महिलांवरील अत्याचाराचे प्रकार घडताना दिसूनच येत आहे.
नुकतेच सुनेला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम यांच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित विवाहितेने पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कुशाग्र कदम, मंगला कदम, अशोक कदम, गौरव कदम, स्वाती कदम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संभाजीनगर, पुणे येथे २९ मे २०२१ ते २५ जून २०२० या कालावधीत हा प्रकार घडला. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी विवाहित महिलेचा पती कुशाग्र कदम याला गंभीर आजार असल्याचे माहित असतानाही तो लपवून फिर्यादीसोबत त्याचे लग्न लावून दिले.
फिर्यादीला आजार असल्याचे डाॅक्टरांशी संगनमत करून खोटे निदान केले. तसेच आयव्हीएफ उपचार पद्धतीने मूल होण्यासाठी फिर्यादी महिलेवर प्रयोग केला. फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.