अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-गुजरातमधील भरुचमधील पटेल वेलफेअर कोविड रुग्णालयात मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास ही आग लागली. यात 15 जणांचा मृत्यू झाला.
यात 12 रूग्णांचा समावेश आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले.
दरम्यान, या रुग्णालयातील इतर रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटल, सेवाश्रम हॉस्पिटल आणि जंबूसर अल मेहमूद हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
काहींची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काही तासांच्या प्रयत्नांनंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले.
सकाळपर्यंत बचावकार्य सुरूच होते. आग लागताच अग्निशमन दलाची 12 वाहने व 40 रुग्णवाहिका बोलावण्यात आले.
रुग्णांचे कुटुंबीयही घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रुग्णालयाच्या आजुबाजूला सुमारे 5 ते 6 हजार लोकांची गर्दी होती.
ते ओरडत होते आणि सगळीकडे गोंधळ सुरू होता. े. आगीमुळे रुग्णालय व परिसरातील वीज बंद पडली. यामुळे बचावकार्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या.
बर्याच प्रयत्नांनंतर रुग्णांना बाहेर काढले गेले व दुसर्या रुग्णालयात हलवण्यात आले. नवीन रुग्ण आल्यावर बराच काळ बेड्स आणि ऑक्सिजनसाठी प्रतिक्षा करत होते