‘या’ राज्यात दिवाळीला फटाक्यांचा आवाज येणार नाही

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि दिल्लीतील प्रदुषणाची स्थिती पाहता यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे सर्व प्रकारच्या फटाक्यांची साठवणूक, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात येत आहे, असे ट्वीट दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

राजधानी दिल्लीत यंदाही दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी दिसणार नाही, अशा प्रकारचा मोठा निर्णय केजरीवाल सरकारकडून घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षीही दिल्लीत फटाके फोडण्यावर केजरीवाल सरकारने बंदी घातली होती. . लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि दिल्लीतील प्रदुषणाची स्थिती पाहता यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे सर्व प्रकारच्या फटाक्यांची साठवणूक,

विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात येत आहे, असे ट्वीट दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. तसेच केजरीवाल यांनी व्यापाऱ्यांना फटाक्यांची साठवणूक न करण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या वर्षी साठवणूक केल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले होते, त्यामुळे यंदा कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांची साठवणूक करू नका, असे ट्वीट केजरीवाल यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office