सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ तब्बल साडे पाच लाखांचा ऐवज लांबवला!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  एकीकडे कोरोना तर दुसरीकडे वाढलेली प्रचंड महागाई यात सर्वसामान्य माणूस भरडून निघत असताना आता चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे.

पाच ते सहा सशस्त्र दरोडेखोरांनी घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून घरातील तब्बल साडे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात मंगळवारी रात्री दोन ते अडीच सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्तीत रात्री अडीच वाजता चार ते पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत घरातील व्यक्तींना वेठीस धरले, घरातच सामानाची उचकापाचक करून १ लाख ३५ हजार रोख व साडे नऊ तोळे सोने असा साडे पाच लाख रुपयांचा ऐवज लुटला आहे.

येथील माजी वनाधिकारी दौंड तसेच निपाणी वडगाव येथील माजी सरपंच आशिष दौंड यांनी घटनेची माहिती पोलिसांना फोन वरून कळवली. त्यानंतर परिसरात नातेवाईक व शेजारी यांच्या मदतीने चोरटयांचा शोध घेतला असता चोरटयांनी तात्काळ धूम ठोकली.

पोलिसांनी आसपासच्या परिसरात नाकेबंदी केली. परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले

अहमदनगर लाईव्ह 24