गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनामुळे पाचशे जणांचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण पाचशे जणांचा बळी गेला आहे. फेब्रुवारीमध्ये ४८, मार्चमध्ये १२२, तर १७ एप्रिलपर्यंत १७०, असे मृत्यू झाले आहेत. त्यानंतर पोर्टलवर १०२ जणांचा मृत्यू दाखविण्यात आला.

त्यामुळे तीन महिन्यांत तब्बल पाचशे जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक, विविध आजार असलेले त्यांच्यापासून बाधित होत आहेत.

ते गंभीर असलेल्या रुग्णांना उपचार करेपर्यंत अनेक समस्या तयार होतात. त्यामुळे त्यांचे मृत्यू होत असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. सध्याच्या स्थितीला जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयानक झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयांत एकही बेड शिल्लक नाही. प्रशासनाने सर्व कोविड सेंटर व हॉस्पिटल मिळून सोळा हजार बेडची तयारी केली आहे. मात्र, रोज तीन हजार जण कोरोनाबाधित होत असून, सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजारांच्या वर गेली आहे.

त्यामुळे १२ हजारांच्या वर रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. सर्व गंभीर रुग्णांना शासकीय अथवा खासगी रुग्णालयातच दाखल केले जात असून, तिथेच त्यांचा मृत्यू झाला आहे.

गृहविलगीकरणात मृत्यू झालेल्यांची संख्या जिल्ह्यात नगण्य आहे.दरम्यान जिल्ह्यातिलवधता मृत्युदर जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24