संतापजनक अहमदनगर शहरात पाच जणांनी महिलेसोबत केले असे काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- शहरातील घासगल्ली येथे 40 वर्षीय महिलेशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दस्तगीर बडेसाब सय्यद, निसार बडेसाब सय्यद, अबराल अल्ता हाजी, निहाल दस्तगीर सय्यद (सर्व रा. बाराईमाम कोठला, अहमदनगर) आणि समीर शेख (रा. मुकुंदनगर, अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे

की, बुधवार दि. 7 जुलै रोजी पुतण्यासोबत आरोपींच्या दुकानात बकर्‍यांना घास आणण्यासाठी गेले असता आरोपी दस्तगीर सय्यद आणि निसार सय्यद यांनी ओढणी ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच दुकानात ओढण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी भाऊ व बहिण भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना आरोपी अबराल हाजी, निहाल सय्यद आणि समिर शेख यांनी भावाला चाकु मारून दुखापत केली.

तसेच बहिणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24