अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- राज्यात आज 5 हजार 225 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 557 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 14 हजार 921 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.93 टक्के आहे. राज्यात करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. असे जरी असले तरी करोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत असल्याने, काहीसं दिलासादायक वातावरण राज्यात आहे.
राज्यात दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ही कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.
राज्यात आज 154 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. दिलासादायकबाब म्हणजे एकूण 33 जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात आज एकाही मृत्यूची नोंद नाही. दरम्यान राज्यात सध्या 57 हजार 579 रुग्णावर उपचार सुरु आहेत.