Fixed Deposit Interest Rate : देशातील अनेक मोठ्या बँकांनी मुदत ठेव योजनांना सुरुवात केली आहे, ज्यामध्ये कमीत कमी वेळेत जास्त व्याजदर दिला जात आहे. जर तुम्हालाही कोणत्याही या योजनांमध्ये रस असेल तर गुंतवणुकीसाठी एक उत्तम संधी आहे.
आता फेडरल आपल्या ग्राहकांना मुदत ठेवींवर सर्वात जास्त व्याज देत आहे. त्यामुळे जर तुम्हाला या बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. परंतु तुम्हाला गुंतवणूक करण्यापूर्वी मिळणारे व्याज किती असावे ते माहिती असावे.
बचत खाते व्याज दर
बँक आपल्या बचत बँक खात्यांवर 7.15% पर्यंत व्याज दर देत आहे. या बँकेच्या वेबसाइटनुसार, ‘व्याजदर रेपो दरांशी जोडले असल्याने RBI द्वारे T 1 च्या आधारावर रेपो दर सुधारित करण्यात येतील त्यावेळी व्याजदर बदलतील.वर नमूद केलेले दर दिवसाच्या शेवटी बचत बँक खात्यांमध्ये (निवासी/NRE/ONR) ठेवलेल्या दैनिक शिल्लकवर मोजण्यात येतात. ते त्रैमासिक आधारावर संबंधित खात्यांमध्ये जमा केले जातात. बचत खाते व्याज दर रेपो दर संलग्न असून सध्या RBI चा रेपो दर 6.50% आहे.
जाणून घ्या मुदत ठेवींवर मिळणारे व्याज दर
फेडरल बँकेकडून 7 ते 29 दिवसांत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींवर 3% व्याजदर आणि 30 ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींवर 3.25% व्याजदर दिले जात आहे. 46 दिवस ते 60 दिवसांत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींवर 4.00% आणि 61 दिवस ते 90 दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 4.75% व्याजदर मिळत आहे.
तसेच बँकेच्या 91 ते 119 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या मुदत ठेवींवर 4.75% व्याजदर दिले जाईल. 120 ते 180 दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींना आता 5% व्याजदर देण्यात येईल. 181 दिवस ते 270 दिवसांत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर 5.75% आणि 271 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 6.00% व्याजदर ग्राहकांना देण्यात येत आहे.
इतकेच नाही तर आता ही बँक 1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींवर 6.80% आणि 15 महिने ते 2 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या मुदत ठेवींवर 7.25% व्याजदर मिळेल.
तर दोन वर्षांपेक्षा जास्त ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदतीच्या ठेवींवर आता 6.75% दराने व्याज दिले जात आहे. तीन वर्षे ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदतीच्या ठेवींवर आता 6.60% व्याजदर उपलब्ध आहे. 5 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त मुदतीच्या मुदतीच्या ठेवींवर 6.60% व्याज दर देण्यात येत आहे. परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की हे FD व्याजदर 17 मे 2023 पर्यंत असेल.