Flower Farming: उन्हाळ्यात या फुलांची शेती सुरु करा आणि मिळवा बक्कळ पैसा; वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Flower Farming; देशात फार पूर्वीपासून फुलांची शेती (Floriculture) केली जात आहे. काळाच्या ओघात यामध्ये आता मोठा बदल झाले असून शेतकरी बांधव (Farmer) आधुनिक पद्धतीने फुलशेती करून चांगली कमाई देखील प्राप्त करीत आहेत. आता देशात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक स्तरावर फुल शेती (Flower Farming Business) केली जाऊ लागली आहे.

यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात (Farmers Income) मोठी वाढ झाली आहे. निश्चितच काळाच्या ओघात आता शेतकरी बांधव पारंपारिक पिकाऐवजी फळबाग लागवड (Orchard Planting) तसेच फुलशेतीकडे मोठ्या आशेने बघू लागले आहेत.

आपल्या राज्यातही (Maharashtra) फुल शेती आता मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. मित्रांनो तसं पाहता फुलांना बारामाही मागणी असते. मात्र उन्हाळ्यात लग्नसराई असल्याने याच्या मागणीत मोठी वाढ होते. यामुळे उन्हाळी हंगामात फुलशेती शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याची ठरत असल्याचा दावा केला जातो.

या पार्श्‍वभूमीवर आज आम्ही आपणास उन्हाळी हंगामात उत्पादित केल्या जाऊ शकणाऱ्या काही फुलांविषयी माहिती देणार आहोत. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी फायदा होणार आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.

मित्रांनो फुलांची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम हंगाम हा उन्हाळी हंगाम मानला जातो. प्रखर सूर्यप्रकाशात फुलांची झाडे आपले अन्न चांगले बनवू शकतात, त्यामुळे त्यांचा विकासही चांगल्या पद्धतीने होतो. अशा परिस्थितीत या महिन्यांत तुम्ही फुल शेती सुरू करू शकता. आपण या महिन्यात सूर्यफूल, हिबिस्कस, झेंडू, बल्सम अशी काही फुले लागवड करू शकता. आपण केवळ या फुलांची शेतीचं करू शकता असे नाही तर आपल्या घराच्या बाल्कनीत देखील या महिन्यात या फुलांची लागवड करून घराची शोभा वाढवू शकता. यामुळे तुमच्या घराची शोभा ही निश्चितचं वाढेल शिवाय घरातील वातावरणही मस्त राहील.

सूर्यफूल शेती: खरं पाहता सूर्यफुलाची रोपे वर्षातून तीनदा लावता येतात, मात्र उन्हाळ्यात ही रोपे लावणे खूप फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तुम्ही याची व्यावसायिक स्तरावर शेती करून चांगली कमाई करू शकता शिवाय घराच्या बाल्कनीत भांड्यातही लावू शकता. असे केल्याने घरातील तापमानाचे संतुलन व्यवस्थित राहते.

हिबिस्कस फ्लॉवर: उन्हाळ्यात हिबिस्कसची रोपे शेतात लावली जाऊ शकतात शिवाय घरामध्येही लावता येतात. हिबिस्कसची फुले अनेक रंगात येतात. हे सुंदर फुलांच्या श्रेणीमध्ये ठेवले आहे. याशिवाय ते लावल्याने घराच्या सौंदर्यातही भर पडते. या फुलाला उन्हाळ्यात अधिक मागणी असल्याचे सांगितले जाते यामुळे निश्चितच हिबिस्कस फुलशेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे.

झेंडु फुलशेती: झेंडूच्या फुलांची लागवड करणे तुलेनेने खूप सोपे आहे. या फुलाच्या लागवडीतून कमी खर्चात लाखोंचा नफा मिळू शकतो. वासाने उत्तम असण्यासोबतच बाजारात या फुलांची किंमतही खूप जास्त असते. यामुळे या उन्हाळ्यात या फुलाची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे.

बालसम फुलशेती: बालसम ही एक सुंदर फुल वनस्पती आहे. रोपे लावल्यानंतर 30 ते 40 दिवसांत ही वनस्पती विकसित होऊन फुले द्यायला सुरुवात करते. या रोपाची लागवड करून शेतकरी बांधव अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता शिवाय या फुलाला घराच्या बाल्कनीत लावून घरातील वातावरणही थंड ठेवता येते. निश्चितच बाल्सम फुलाची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे.