अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर मध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मागच्या प्रमाणे दर रविवारी श्रीरामपूर शहरात सर्वांनी जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन नगराध्यक्ष अनुराधा आदिक व ‘मर्चंट’चे अध्यक्ष विशाल पोफळे यांनी केले.
तालुक्यात २२ कोरोना रुग्ण सापडल्याने सर्वच यंत्रणा सावध झाल्या आहेत. शनिवारी प्रांताधिकारी अनिल पवार, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस निरीक्षक संजय सानप, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी बसस्थानक,
भाजी मंडई, बाजारपेठ आदी गर्दीच्या ठिकाणी जाऊन मास्क न वापरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोनशेपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई केली.