कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचे पालन करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-कोरोनाला आपल्याला पळवून लावायचे आहे. त्यासाठी सर्वांनी आपल्यासह आपल्या कुटुंबाची तसेच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. नियमीत मास्क व सॅनिटायझरचा वापर करून वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे.

परिसरातील रुग्णांनी या कोविड सेंटरचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी केले.शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह ३५ गावासाठी बोधेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात ५० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर सुरू करण्यात आले, या कोवीड सेंटरचे उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी शेवगावच्या तहसीलदार अर्चनाताई पागिरे, तालुका आरोग्य अधिकारी सलमा हिराणी, पं.स.सभापती क्षितिज घुले, गटविकास विकास अधिकारी महेश डोके, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक परदेशी, तालुका वैद्यकीय अधीक्षक भागीनाथ काटे,

डॉ.अरुण भिसे, डॉ.प्रमोद जाधव, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलासराव नेमाने, बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष प्रशांत देशमुख, वेंकटेश मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष वेंकट देशमुख, जेष्ठ नेते भाऊराव भोंगळे,

माजी सरपंच रामजी अंधारे, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष बन्नूभाई शेख, बाबासाहेब देशमुख, गजानन देशमुख, खरेदी विक्री संघाचे संचालक एकनाथराव कसाळ, सुकळीचे सरपंच प्रल्हाद देशमुख, हातगावचे सरपंच अरुण मातंग, बाजार समितीचे सचिव राजेंद्र राजपुरे, शेषराव वंजारी, रामकीसन काजळे,

नितीश पारनेरे, संजय वडते, संतोष पावसे, सचिन घोरतळे, मोहित पारनेरे, रमेश दुसंगे, विकास घोरतळे, प्रल्हाद शिंदे, राजेंद्र ढमढेरे, अरुण बामदळे, शेखर बामदळे, ग्रामविकास अधिकारी राजाराम काटे, तलाठी अमर शेंडे, सोमनाथ माने यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24