Cyber ​​Security Tips : सायबर सिक्युरिटीसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स, नाहीतर..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cyber ​​Security Tips : सध्याच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे फसवणुकीसोबतच महत्त्वाची माहितीही हॅकर्स काढून घेतात. सर्वात मोठी गोष्ट अशी की अनेकजण सायबर सिक्युरिटीकडे दुर्लक्ष करतात.

त्यामुळेच त्यांची फसवणूक होत आहे. जर तुम्हीही अशी चूक करत असाल तर ती आजच टाळा. कारण पैसे आपल्याला कधीही मिळवता येतात परंतु, महत्त्वाची माहिती मिळवता येत नाही.

इंटरनेटवर अनेक डेटा

आज व्हीसर्व्ह इन्फोसिस्टम्सचे नॉर्थ बिझनेस हेड नीरज ओझा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “21 व्या शतकात सर्व काही इंटरनेटच्या माध्यमातून होत आहे. बँकेपासून व्यवसायापर्यंतचा सर्व डेटा इंटरनेटवर आहे”.

सायबर सुरक्षेचे ज्ञान आवश्यक

डेटा सुरक्षित ठेवायचा असेल तर सायबर सुरक्षा या विषयावर विशेष ज्ञान असले पाहिजे. यासोबतच बचावाच्या पद्धतीही जाणून घेतल्या पाहिजेत. दिल्ली एम्स, गुगल, सॅमसंग आणि इतर हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, फिनटेक इंडस्ट्री इत्यादीसारख्या काही घटना पूर्वी घडल्या होत्या.व्यक्तीपासून मोठ्या संस्थांपर्यंत सायबर सुरक्षा किती महत्त्वाची झाली आहे असे सायबर हल्ले हे दाखवतात.

सध्याच्या काळात अनेक हॅकर्स डेटा चोरून लोकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळेच बँक खात्यांसह कंपन्यांचा डेटाही हॅक झाला आहे. हॅकर्स कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांच्या मागण्या करतात.

ही चिंतेची बाब असून याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा घातक ठरेल. अशा गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे थांबवण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे.

होईल डेटाचे संरक्षण

  • सुरक्षेसाठी तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धत वापरू शकता.
  • सरकारने सायबर सुरक्षेसाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 लागू केला आहे.
  • तुमच्या खात्याचा पासवर्ड वेळोवेळी बदलायला हवा.
  • स्पॅम ईमेल, हॅकिंग, फिशिंग, व्हायरस, रॅन्समवेअर इत्यादीद्वारे सायबर गुन्ह्यांची अंमलबजावणी केली जाऊ शकते.
  • तुम्ही जे खाते वापरत नाही खाते हटवा.
  • कंपनीच्या नेटवर्कचे सायबर ऑडिट करा.
  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीला खात्याचा आणि फोनचा पासवर्ड देणे टाळा.

अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत

सुरक्षा हल्ल्यांमध्ये आपल्या देशाचा पाचवा क्रमांक लागतो हे टाळण्यासाठी अनेक उपकरण हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहेत.तुम्ही त्यांचा वापर करू शकता. डेटा सुरक्षा एक प्रक्रिया ज्यामध्ये डिजिटल डेटा समाविष्ट आहे.

अनेक सुविधा उपलब्ध

  • डेटा सुरक्षा
  • मोबाइल सुरक्षा
  • माहिती सुरक्षा
  • नेटवर्क सुरक्षा
  • ॲप्लीकेशन सुरक्षा
  • वापरकर्ता सुरक्षा
  • आपत्कालीन सुरक्षा
  • क्लाउड सुरक्षा

नीरज ओझा बोलताना पुढे असे म्हणाले की, सध्या पैशापेक्षा सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे, कारण पैसे परत मिळवता येतात. मात्र, एकदा कुणाचा डेटा चोरीला गेला की तो परत मिळवता येत नाही. हॅकर्स ते आपल्या ताब्यात घेतात आणि जे मिळेल ती माहिती काढून घेतात.