अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता सीआयएससीई (CISCE) नेसुद्धा 12 बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे.
देशातील सध्याची कोरोनास्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता हा निर्णय घेण्याता आला. या निर्णयानंतर आता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर काम केले जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर बारावीच्या परीक्षांबाबत केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली CBSE च्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीअंती CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान आता या बैठकीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या निर्णयानंतर आता CISCE नेसुद्धा आपल्या 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.