अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे आज अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. व यावेळी भेसळयुक्त पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अन्न व औषध प्रशासन यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जालिंदर ठकाजी वने (वनेवस्ती घेरूमाल रोड) यांच्या गोठ्यावर धाड टाकली.
दरम्यान भेसळी वापरण्यात येणारी पावडर, ऑईल आढळून आले. भेसळ युक्त दूध जागीच नष्ट करण्यात आले. भेसळीच साहित्य व नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत.
वने हे दररोज १७० लिटर दूध डेअरीला घालत असे.प्रत्यक्षात त्याच्या गोठ्यातून १०० लिटर पेक्षा कमी दूध निघते. वने हा दुधात भेसळ करून दिगंबर पटारे (देवी मंदिर रोड) यांच्या मुक्ताई दूध संकलन केंद्र व प्रकाश शिवाजी
नगरे यांच्या श्रीनिवास दूध संकलन केंद्र (सोनई – शनि शिंगणापुर रोड) येथे दूध घालत होता. दूध भेसळ कारणावरून पटारे यांच्या डेअरीमधील २० हजार रुपये किंमतीच ८०० लिटर दूध नष्ट केले.
तर,१० हजार रुपये ७०० रुपये किंमतीच ४५०० लिटर दूध नष्ट केले. दोन्ही डेअरी मधून दुधाचा नमुना तपासणीसाठी घेतला आहे.