अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- बंदी असतानाही शहरात गुटखा, सुगंधी तंबाखू विक्रीचे प्रकार सुरूच असल्याचे निदर्शनात येत असल्याने श्रीरामपूर शहरातील सय्यद बाबा चौक या भागात अन्न सुरक्षा अधिकारी अन्न औषध प्रशासन विभागाने छापा टाकला.
या छाप्यात 4,140 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात गुटखा व पानमसाला,
सुगंधी तंबाखू तत्सम अन्न पदार्थ विक्री साठा उत्पादन वाहतुकीस बंदी घातलेली असताना याची खुलेआम विक्री होत आहे. यामुळे अन्न औषध प्रशासनाने या अड्ड्यावर छापा घातला.
या कारवाईत तिघांना ताब्यात घेतले असून 4,140 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे यांनी फिर्याद दाखल केली असून
पोलिसांनी अब्दुल अजीज करीम शेख (वय ४८) रा. सुभेदार वस्ती, श्रीरामपूर) अमेर अब्दुल शमी कुरेशी (वय ३०) रा. न्यू कोर्ट श्रीरामपूर, सलीम महंमद सय्यद, (वय ३९) रा, कर्मवीर चौक, श्रीरामपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक श्री. पवार पुढील तपास करीत आहेत.