अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शिक्षकांच्या शासकीय वेतनाचा प्रश्न नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब यांनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातुन सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावल्याबद्दल अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आ. डॉ. तांबे साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त करून मंत्री महोदय यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून तसा GR ही शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.
या निर्णयामुळे विनावेतन शिक्षकांना महिना ११ हजार तर आधीपासून वेतन मिळणाऱ्या शिक्षकांचे वेतन दुप्पट होणार आहे! यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके पा., जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, कार्याध्यक्ष सचिन गुजर, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे,
अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष अनिस शेख, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, युवक काँग्रेस व एन. एस.यु.आय चे जिल्हा समन्वयक तथा शहराध्यक्ष किरण काळे, कार्याध्यक्ष राहुल उगले,श्रीगोंदा तालुका अध्यक्ष दिपक पाटील भोसले, राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव,
शेवगाव तालुकाध्यक्ष डॉ. अमोल फडके, पारनेर तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, नगर तालुका अध्यक्ष संपतराव म्हस्के, पाथर्डी तालुका अध्यक्ष निसार शेख, कर्जत तालुका अध्यक्ष किरण पाटील, जामखेड तालुका अध्यक्ष शहाजीराजे भोसले, मनोहर पोटे, सचिन घुले,
सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाणे, एन.एस.यू. आय चे कार्याध्यक्ष अक्षय क्षीरसागर यांच्यासह युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, विद्यार्थी काँग्रेस,सेवादल व महिला पदाधिकारी उपस्थित होते.