ताज्या बातम्या

कोरोनाचा कहर.. सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या ४ हजारांवर

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra news : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येचा आकडा चार हजारांच्या पुढे राहिला आहे. दिवसभरात ३०४८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

त्यामुळे आता सक्रीय रुग्णांचा आकडा हा २१ हजारांच्या वर गेला आहे. राज्यात ताज्या आकडेवारीनुसार २१ हजार ७४९ सक्रीय रुग्ण आहेत. या रुग्णांवर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे.

राज्यात शुक्रवारी एकूण ४ हजार १६५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गुरुवारी ४ हजार २५५ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. शुक्रवारी ४ हजार १६५, गुरुवारी ४ हजार २५५. बुधवारी ४ हजार २४ अशी मागील काळातील आकडेवारी आहे.

राज्यातील रुग्णांपैकी सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईतील रुग्णवाढ कायम आहे. गेल्या २४ तासांमध्ये २ हजार २५५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी जवळपास ७० टक्के रुग्ण केवळ मुंबईतील आहेत.

Ahmednagarlive24 Office