या कारणासाठी अभिनेत्री अलका कुबल यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. बारामतीतल्या ‘गोविंदबाग’ या पवारांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली.

यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर उपस्थित होते. ही भेट औपचारिक असल्याचे सांगण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी “काळूबाईच्या नावानं चांगभलं” या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान सेटवरील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती.

या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यावेळी शरद पवार यांनी सेटवरील सर्व कलाकारांची आपुलकीने चौकशी केली होती आणि भेटीचे निमंत्रण दिले होते.

आज कुबल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मालिकांचे चित्रीकरण, कोरोनामुळे येणार्‍या अडचणी आणि आगामी प्रोजेक्ट संदर्भात चर्चा करण्यात आली. अलका कुबल सांगितले की, पवार साहेबांबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

यात प्रमुख्याने मराठी चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांनी ग्रामीण भागाकडे चित्रिकरण करावे, असा आग्रह पवार साहेबांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी, पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर आहे,

त्यामुळे चित्रपट आणि मालिका निर्मात्यांनी शहरात चित्रीकरण करण्याबरोबरच ग्रामीण भागामध्ये विविध पर्यटनस्थळे आणि गावागावांमध्ये असलेल्या लोकेशनचा देखील वापर करावा. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत होईल, असे आवाहन केल्याचे कुबल यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24