हवामान खात्याने वर्तवला अंदाज ; शेतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- ढील काळही शेतकऱ्यांना काळजीत टाकणारा असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील आठवडाभर भारतात पावसाचं प्रमाण कमी असणार आहे.

त्यामुळे खरीपातील पिकांना लागणाऱ्या पाण्याविना शेतीच्या अडचणी काही काळ वाढण्याची शक्यता आहे. असं असलं तरी विदर्भाच्या काही भागात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा,

गुजरात, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आणि छत्तीसगडमधील काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात कमी पाऊस होईल.

स्कायमेट या हवामान अभ्यास संस्थेच्या अहवालानुसार, २९ जूननंतर देशातील बहुतांश भागात मान्सूनचा जोर कमी होईल. पु

ढील ४-५ दिवस वातावरण कोरडं राहिल. असं असलं तरी काही ठिकाणी चांगला पाऊसही होईल.

यात प्रामुख्याने पूर्वोत्तर भारत, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागाचा समावेश आहे. याशिवाय देशातील अधिकाधिक भागात पुढील आठवडाभर पावसाचं प्रमाण कमी असेल.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24