माजी कृषिमंत्री पवारांनी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले हे आश्वासन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- कृषी विद्यापीठांमधील अनेक महत्वपूर्ण विषयांबाबत चर्चा करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांनी नुकतीच बारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री ना. शरद पवार यांची भेट घेतली.

दरम्यान कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यापीठातील कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्याबद्दल या भेटीदरम्यान चर्चा केली.

या चर्चेत त्यांनी कृषी क्षेत्रापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या कोणत्या योजना असतील तसेच दृष्टी, आराखडा काय असेल, याबाबत त्यांचे मार्गदर्शन घेतले. विद्यापीठांमधील प्रलंबित प्रश्न, रिक्त पदे,

संशोधनासाठी निधी याबाबत चर्चा केली. केंद्र शासनाकडील कृषी विद्यापीठाचे प्रश्न सोडविण्यासाठी पवार यांनी कुलगुरू डॉ. पाटील यांना नवी दिल्लीत संबंधित केंद्रीय मंत्र्यांबरोबर बैठक आयोजन करण्याचे आश्वासन दिले.

विद्यापीठांमधील रिक्त पदे, संशोधनासाठी निधी, विद्यापीठाच्या मोठ्या शहरातील जमिनीचे अधिग्रहण याबाबतही पवार यांचे लक्ष वेधले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24