अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- नगर अर्बन बँक निवडणुकीसाठी सत्ताधारी सहकार पॅनलच्या वतीने माजी संचालकांनी गुरुवारचा मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केले.
यात शहर मतदार संघातून माजी व्हाईस चेअरमन अशोक कटारिया, शैलेश मुनोत यांनी तर सुरत येथील दिनेश कटारिया यांच्यासह संगमनेर शाखा मतदार संघातून अतुल राधावल्लभ कासट, शेवगाव शाखेतून नगरसेवक कमलेश गांधी,
कर्जत शाखेतून रासपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र कोठारी यांच्या पत्नी मनीषा कोठारी व मागासवर्गीय संघातून नंदा साठे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी सहकर पॅनलचे नेते सुवेंद्र गांधी, शहर बँकेचे माजी चेअरमन डॉ.विजय भंडारी आदींश विविध क्षेत्रातिल नागरीक व मतदार उपस्थित होते.