अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- गेल्या वर्षभरापासून सर्वांच्याच आरोग्यासाठी धोकादायक ठरणार्या कोरोणावर लस आली असली तरी या कोरोणाचा प्रादुर्भाव अजूनही वाढतच असल्याने स्वतःबरोबरच सर्वांनीच आपल्या कुटुंबाची आणखी काही दिवस काळजी घेण्याची गरज आहे.
असे आवाहन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले आहे. कर्डिले यांनी नुकतीच कोरोणाची लस घेतली. यावेळी डॉक्टर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. स्वतः सह कुटुंबाच्या प्रगतीसाठी सातत्याने धावपळ करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कोरोणाने काही दिवस तरी घरी बसून ठेवण्याचे काम केले.
सातत्याने वेगवेगळे आजार पुढे येऊ लागल्याने आता प्रत्येकाने आरोग्यम् धनसंपदा या उक्तीप्रमाणे स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. साठ वर्षाच्या पुढील व्यक्तींना तिसऱ्या टप्प्यात कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली असून,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करत मी साठ वर्षाच्या यादीत बसत असल्यामुळे मी येथे लस घेण्यासाठी आलो आहे. असे मिश्किलपणे म्हणत तरुणवर्ग तसेच काही विद्यार्थी देखील कोरोणा पॉझिटिव आढळून येत असल्याने त्यांनी देखील विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
या पुढील काही दिवस सोशल डिस्टन ठेवून तोंडाला मास्क वापरत सातत्याने हात धुण्याची गरज आहे. असे आवाहन मंत्री कर्डिले यांनी यानिमित्ताने जनतेला केले आहे.