माजी मंत्री पिचड यांचे मार्गदर्शन भावी पिढीला दिशादर्शक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  राज्यातील राजकारण व समाजकारणात माजी मंत्री मधुकर पिचड यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्यांचे मार्गदर्शन भावी पिढीला नेहमीच दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्गार राज्य विधानसभेचे हंगामी अध्यक्ष तथा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले.

विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ व इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी शुक्रवारी सायंकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची राजूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळेस झिरवाळ यांनी पिचड यांच्या प्रकृतीची विचारपूस करून दीर्घायुरारोग्य चिंतले. यावेळी भाजपाचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री व माजी आमदार वैभव पिचड हेही उपस्थित होते.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ व इगतपुरीचे आमदार खोसकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

दरम्यान झिरवाळ यांनी आदिवासी समाजातील विविध प्रश्नांवर त्यांच्या सोबत चर्चा केली. दोन तासाच्या कालावधीनंतर झिरवाळ व खोसकर नाशिककडे रवाना झाले.

अहमदनगर लाईव्ह 24