माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या मुलीचे लग्न… लाडक्या मुलीला निरोप देताना …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- माजी मंत्री प्रा राम शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील कुंडलीक नारायण खांडेकर

यांचे सुपुत्र जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा शुभविवाह पुणे येथील रिट्स कार्लटन हॉटेल मध्ये काल दुपारी पार पडला. राम शिंदे यांना डॉक्टर लेकीसाठी कलेक्टर जावई मिळाला आहे.

लग्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोहित पवार यांची यावेळी आमनेसामने भेट झाली.

आपल्या लाडक्या मुलीला निरोप देताना प्रा. शिंदे अत्यंत हळवे झाले होते.सायंकाळी उशिरा पर्यंत त्याच ठिकाणी स्वागत समारंभ उशिरापर्यंत सुरू होता त्यास राज्यातील अत्यंत महत्वाच्या नेते मंडळींनी उपस्थिती दर्शवली.

काल रविवारी दुपारी हा लग्न सोहळा संपन्न झाला मात्र कोरोना नियमावली नुसार कुटुंबातील मोजके व पाहुणे मंडळी उपस्थित होती. कोरोनामुळे मतदारसंघातील अनेकांना इच्छा असून सुद्धा उपस्थित राहता आले नाही.

कोरोनामुळे काही उपस्थितीला मर्यादा आहेत त्या मुळे घरातूनच अक्षता टाकून माझ्या मुलीला आशीर्वाद द्या असे आवाहन प्रा राम शिंदे यांनी केले होते. राम शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता शिंदे यांच्या लग्न समारंभाला देवेंद्र फडणवीसांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,

विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, रासप अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह

अनेक दिग्गज नेते मंडळींनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. डॉ. अक्षता शिंदे आणि आएएस श्रीकांत खांडेकर यांचा साखरपुडा व्हॅलेंटाईन डेला झाला होता.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24