अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- “राहुरी नगरपालिका पिढ्यानपिढ्या ताब्यात असताना नगर तालुक्यात नगरपालिका काढायला निघाले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुळा धरणाचे पाणी बीडला जाणार. अशी अफवा उठवून, भीती घालून मते मिळविली. आता सरकार तुमचे आहे.
तुमचे मामा त्या खात्याचे मंत्री आहेत. बीडला पाणी जाणार असल्याचा एक तरी लेखी पुरावा जनतेला द्यावा. अन्यथा राहुरीच्या जनतेची माफी मागावी. अशा शब्दात मंत्री तनपुरेंवर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी टीका केली आहे.
राहुरी येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत कर्डिले बोलत होते. कर्डिले यांनी बैठकीत मंत्री तनपुरे यांच्यावर घणाघाती टीका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, राहुरी कारखान्याच्या शेतकरी, कामगार व कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत मदत केली. परंतु, कारखाना चालू करण्यासाठी कर्डिलेंकडे कशाला जाता.
माझ्याकडे या. असे तनपुरे म्हणतात. त्यांना आव्हान आहे. त्यांनी कारखान्याला शंभर कोटी रुपयांच्या कर्जात घातले. ते कर्ज बँकेत भरा. माझ्यासह खासदार सुजय विखे व कारखान्याचे संचालक मंडळ तुमच्या वाड्यावर येऊ.”
असेही कर्डिले यांनी सांगितले. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता. २६) सकाळी साडेदहा वाजता राहुरी येथे बाजार समिती समोर नगर-मनमाड महामार्गावर भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे.