अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहकारी बँकेच्या चार जागांसाठी आज मतदान झाले होते. यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी मतदानाच्या दिवशी मतदारांचे आभार मानत काही खळबळजनक खुलासे केले आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक प्रसंगी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले हे बोलत होते. ते म्हणाले कि, बँक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीचा प्रस्ताव मी ठेवला होता.
ही बँक जुनेजाणते, ज्येष्ठ नेत्यांनी उभी केली, असे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले. या ठिकाणी पक्षीय राजकारण नको अशी भूमिका मांडल्यानंतर त्यांनीसुद्धा पाठिंबा दिल्यानंतर खासदार सुजय विखे,
माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब यांच्याशी संपर्क केला. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर दोन्ही बाजूंनी बिनविरोध निवडणूकीसांठी तयार झाले.
त्यानंतर सर्व साखर कारखानदार व प्रास्तापिक पुढाऱ्यांनी आपआपल्या जागा बिनविरोध करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. त्यांनी निवडी बिनविरोध करून घेतल्या पण माजी जागा बिनविरोध होऊ नये यासाठी काही पुढाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून ही निवडणूक लादली.
निवडणूक लादली याच्याशी माझी तक्रार नाही. लोकशाही पद्धतीने निवडणुकीला सामोरे गेले. मोठ्या मतधिक्याने जिल्हा बँकेचा संचालक होणार, असे कर्डिले म्हणाले …
म्हणून निवडणुकीत माझा पराभव झाला :- माजी आमदार कर्डीले म्हणाले कि, नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे दीडशे कोटीचे वाटप केल्यामुळे कारखानदार व प्रस्तापित नाराज झाले. ते जागे होऊन कर्डिले हे संचालक पदावर दिसता कामा नये,
यासाठी त्यांनी माझ्या विरोधात काम करण्यास सुरूवात केली. जिल्हा बँकेत मी त्यांना अडसर ठरतो म्हणून मला संपवण्याचा डाव गेली पंचवीस वर्षांपासून करतात. मागील आमदारकीच्या निवडणूकीमध्ये माझी हलगर्जीपणा व दुर्लेक्षामुळे माझा पराभव झाला.
राजकारणात मला संघर्षाशिवाय कुठहीली गोष्ट मिळाली नाही. माझ्याकडे आता आमदारकी नाही. साखर कारखाना नाही. कॉलेज नाही, तरीही जनता माझ्यापाठीमागे आहे.