अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- काँग्रेस राष्ट्रवादी सरकार काळात भु संपादन पैसे मिळण्यासाठी पिढ्यानपिढ्या वाट पहावी लागत होती पण आता आधी पैसे मिळतात मग काम सुरू होते.
अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी केली आहे. अहमदनगर बाह्यवळण रस्त्याचे एक हजार रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन समारंभ माजी मंत्री मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की,काँग्रेस राष्ट्रवादी सरकार काळात भु संपादन पैसे मिळण्यासाठी पिढ्यानपिढ्या वाट पहावी लागत होती पण आता आधी पैसे मिळतात मग काम सुरू होते.निळवंडे साठी भाजपा सरकारने निधी दिला आणि जिल्ह्यातील 2 मंत्री त्याचे श्रेय घेत आहेत.
माझ्या 4 वेळच्या आमदार कालावधी मध्ये जेवढी रस्त्यांची कामे झाली नाहीत तेवढी कामे फडणवीस सरकारच्या काळात झाली. जिल्ह्यातील कोणत्याही मंत्रांनी कोरोना काळात कोविद सेंटर सुरू करून जनतेला मदत केली नाही.मंत्री पदाचा फायदा फक्त स्वतः साठी केला.