अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- अलिबाग उरण मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं गुरुवारी पहाटे निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते. मागील तीन ते चार वर्षांपासून ते सतत आजारी होते.
वाढदिवशीच मधुकार ठाकूर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.आजच म्हणजे १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो. दुर्दैवाने वाढदिवशीच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. माजी आमदार असणाऱ्या मधुकार ठाकूर यांचा राजकारणात खूप खडतर प्रवास होता.
झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि २००४ ते २००९ या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे ते आमदार होते.
मधुकर ठाकुर यांनी 2004 मध्ये शेकापच्या तत्कालीन राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचा पराभव करीत राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. अलिबागमध्ये तब्बल 32 वर्षांनी त्यावेळी शेकापचा अलीबाग मध्ये पराभव झाला होता.
राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री स्व.विल्लसराव देशमुख, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांचे सोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
आज दुपारी २ वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.ठाकुर यांच्या निधनानंतर रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.