अतिवृष्टीने खचलेल्या माणसांना धीर देण्यासाठी पोहचले माजी आमदार पिचड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-  जुलै महिन्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यातच अकोले मध्ये चांगला पाऊस झाला. भंडारदरा क्षेत्रात देखील पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मात्र आता अतिमुसळधार पावसामुळे अनेकांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

भंडारदरा पणलोट क्षेत्रातील गावात आठ दहा दिवस मुसळधार पाऊस पडला. सततच्या पावसाने या भागातील आदिवासी शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी, खचलेल्या माणसांना धीर देण्यासाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी या भागाचा दौरा केला.

वर्ग खोल्या वसतिगृह खोल्यांची गळती सुरु यावेळी लोकांनी आपल्या अडचणी वैभवराव पिचड यांच्याकडे मांडल्या. मूतखेल येथील आश्रम शाळा गळत आहे. इमारती दुरुस्तीसाठी शासनाने पैसे दिले आहेत. पण प्रकल्प अधिकारी ते खर्च करण्यास परवानगी देत नाही.

शाळा सुरू झाल्या. मात्र पावसामुळे शाळा गळतात. वर्ग खोल्या वसतिगृह खोल्यांची गळती यामुळे शिक्षक पालक हतबल आहेत. पावसाने भात रोपे टाकल्यावर दडी मारली होती. त्यामुळे भात लागवडी उशिरा झाल्या. भाताचे फुटवे त्यामुळे निघाले नाहीत त्यातच खतेही उपलब्ध नाहीत.

करोनामुळे लोक दीड वर्षापासून घरीच आहेत. रोजगार नाही लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसायही बंद आहे. लोक सध्या मोदी सरकारने दिलेल्या मोफत रेशनवर कसे बसे जगत आहेत. मात्र उपासमारीचे संकट या भागाला भेडसावत असून करोनाची तिसरी लाट जर आली तर लोक उपासमारीने मारतील, अशी भीती पिचड यांनी व्यक्त केली.

अहमदनगर लाईव्ह 24