माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले मनाला फार दुःख झाले आहे….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- छोट्याशा व्यवसायापासून ते केंद्रीयमंत्री पदापर्यंत झेप घेणारे माजी मंत्री दिलीप गांधी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने मनाला फार दुःख झाले आहे.

त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली होती. कुठलाही वारसा नसताना लोकांचे प्रश्न सोडवून जिल्ह्यामध्ये लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण झाली होती.

सर्वसामान्याचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.नगर तालुक्याच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या शोक सभेत कर्डिले बोलत होते.

यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, काँग्रेस नेते विनायक देशमुख, बाजार समिती सभापती अभिलाश घिगे, खरेदी विक्री संघाचे सभापती सुरेश सुबे,

नगरसेवक मनोज कोतकर, उपसभापती संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, सुनील पंडीत, शरद दळवी, दादासाहेब दरेकर, विलास शिंदे आदी उपस्थित होते.

महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, माजी खासदार दिलीप गांधी यांचे उड्डाण पुलावर नाव देण्यासाठी आम्हा सर्वांचे अनुमोदन आहे.

पक्षनिष्ठेला महत्त्व देणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ध्येय चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आपले राजकारण करून समजाचे प्रश्न सोडविले. राज्यासहित जिल्हाभर दांडगा लोकसंपर्क असल्यामुळे लोकप्रिय नेता म्हणून त्यांची ओळख होती.

शहर विकासासाठी नेहमी अग्रही भूमिका पार पाडत होते. असे ते म्हणाले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24