शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखाला जिवेमारण्याची धमकी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-मेडीकल चालविण्यासाठी हफ्त्यापोटी दरमहा दहा हजार रुपये द्या. अन्यथा कोयत्याने जीवे ठार मारण्याची धमकी एका खंडणीखोराने कोपरगावमधील शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखाला दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी खंडणीखोराच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तथा प्रगती मेडीकलचे चालक भरत आसाराम मोरे (रा. सप्तर्षीमळा) यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सप्तर्षीमळा येथे प्रगती मेडीकल दुकान असून राहण्यासही त्याच परिसरात आहेत.

एकेदिवशी सचिन संजय साळवे (रा.गजानननगर) हा मेडिकलवर आला. त्याने मेडीकल चालविण्यासाठी हफ्त्यापोटी दरमहा दहा हजार रुपये मागून हातातील लोखंडी कोयत्याने जीवे ठार मारण्याची भीती घालत शिवीगाळ करुन धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24