माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे पार्थिव अहमदनगरकडे रवाना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे माजी खासदार तथा माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे बुधवारी (दि.१७) पहाटे निधन झाले. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर औषधोपचार चालू होते.

अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार :- गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६९ वर्षांचे होते. त्यांचा पार्थिव दिल्ली येथून नगरला रुग्णवाहिकेतून आणण्यात येत असून, गुरुवारी (दि.१८) त्यांच्यावर नगरच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सर्वांना मानसिक धक्का :- दरम्यान, माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अकाली निधनाचे वृत्त नगर जिल्ह्यातच धडकताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. साधारणपणे १५ ते २० दिवसांपूर्वी ठणठणीत असलेले दिलीप गांधी काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वांना मानसिक धक्काच बसला.

चार वाजता अंत्यसंस्कार :- त्यांच्यावर नगरमध्ये आज सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दिलीप गांधी यांचे पार्थिव घेऊन येणारी अ‍ॅम्ब्युलन्स कोपरगावमध्ये दाखल झाली आहे.

पार्थिव कोपरगावहून नगरकडे रवाना :- स्व. गांधी यांच्या चाहत्यांकडून त्यांना अभिवादन करण्यात आले असून पार्थिव कोपरगावहून नगरकडे रवाना झाल आहे. पार्थिव त्यांच्या सुरवातीला निवासस्थानी आणण्यात येणार आहे. गांधी यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते व चाहत्यांनी सकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

असा असेल अंत्ययात्रा मार्ग… :- स्व.दिलीप गांधी यांचे निवासस्थान, गुरुदेव आनंद ऋषीजी समाधी, बुरुडगाव रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, हाय वे वरून मार्केटयार्ड चौक, बंगाल चौकी, बांबू गल्ली, चर्च रोड, गांधी यांचे जुने निवासस्थान, माणिक चौक, नगर अर्बन बँक चौक, नवी पेठ, नेता सुभाष चौक, भाजप कार्यलय, आनंदी बाजार, नालेगाव मार्गे अमरधाम येथे अंत्यसंस्कार

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24