सापडलेले एक लाखाचे गंठण केले परत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- अभिनव पब्लिक स्कूलच्या शिक्षिकेचे दोन तोळे वजनाचे गंठण येथे काम करणाऱ्या अनिता मंडलिक यांनी परत केल्याबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरात आर्थिक संकट ओढावलंय.

अशातच दैनंदिन गरजांची पूर्तता करताना कसरत करावी लागत आहे. अशातच कुणीही सहजासहजी लोभाला बळी पडू शकतो; परंतु अशाही परिस्थितीत अभिनव शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या सेविका अनिता मंडलिक यांनी आदर्शवत प्रामाणिकपणा दाखवुन दिला.

अभिनव पब्लिक स्कुलच्या एका शिक्षिकेचे दोन तोळे वजनाचे गंठन नकळत वर्गात तुटुन पडले. कोरोनाच्या संकटात १ लाख रुपये किंमतीचे गंठन हरविल्याची बाब हवालदिल करणारी होती.

अभिनवच्या सेविका मंडलिक यांना साफसफाई करताना ते सापडले. त्या शिक्षिकेचे गंठन त्या सेविकेने प्रामाणिकपणे परत केले.

तिच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्या शिक्षिकेने त्या सेविकेला साडी देऊन कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी या घटनेची दखल घेत त्या सेविकेचा अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार केला.

‘प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे संस्थेला बळकटी येते’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

याप्रसंगी अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोंसा, वसुंधरा ॲकॅडमीचे प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर, समन्वयक राधिका नवले, प्रशासकीय अधिकारी दिलीपकुमार मंडलिक, कार्यालयीन अधीक्षक वारे, संस्था समन्वयक ज्योती मंडलिक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24