संगमनेर पोलिसांवर हल्ला प्रकरणातील चार आरोपी अटकेत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमध्ये झालेल्या पोलिसांवरील हल्ला प्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही फुटेज पाहून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

अशा परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी मेहनत घेत आहेत मात्र, याच पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर येथे घडला.

संगमनेर येथे घडलेल्या या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला. तसेच या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेचा व्हिडीओ सुद्धा समोर आला होता. व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, काही नागरिकांचा जमाव हा पोलीस कर्मचाऱ्याला घेरून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे.

संगमनेर शहरातील दिल्ली नाक्याजवळ ही घटना घडली होती. मात्र गेल्या 2 दिवसांपासून या घटनेनंतर मुस्लिम समाजाला सोशल मीडियातून बदनामी सुरु आहे.

याकडं लक्ष वेधण्यासाठी आणि हल्ल्याचा निषेध करत मुस्लिम समाजाने पोलिसांना निवेदन दिले. मोजक्या लोकांमुळे समाज बदनाम होत असून

कारवाई करताना जे खरे आरोपी आहे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनाव्दारे केली असून पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24