मराठवाड्यातील चार धरणांमध्ये 100 टक्के जलसाठा तर जायकवाडी निम्मे भरले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे मराठवाड्यातील एकूण धरणांपैकी चार धरणांमध्ये 100 टक्के जलसाठा झाला आहे. तर जायकवाडी धरणात 56 टक्के जलसाठा असून खडका बंधारा शंभर टक्के भरल्याने तो आता ओसंडून वाहत आहे.

मराठावाड्यातील महत्वाचं धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणात 14 हजार क्यूसेकची आवक सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्यापावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

याशिवाय नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. यामुळे जायकवाडी धरणात 14 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा पोचला 56 टक्क्यांवर पोहोचला आहे.

यामुळे औरंगाबाद जालना सह चारशे गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मराठवाड्यातील निम्न दुधना, माजलगाव, मांजरा, पेनगंगा, निम्न तेरणा हे प्रकल्प 100 टक्क्यांच्या वाटेवर आहेत.

प्रकल्पात समाधानकारक पाणी आल्यामुळे मराठवाड्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच जायकवाडी धरणात 1 हजार 201 दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे.

दरम्यान जायकवाडी धरणात पाण्याची आवक कायम राहिल्यास अल्पावधीतच जायकवाडी धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

जायकवाडी धरण 56 टक्के भरल्यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. तर औरंगाबादमध्येही मुसळधार पाऊस होत आहे. अंजिठा लेणी परिसरात देखील जोरदार पाऊस होत आहे.

Ahmednagarlive24 Office