माजी सैनिक फुंदे खून प्रकरणातील चौघेजण घेतले ‘या’ ठिकाणाहून ताब्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी येथील माजी सैनिक विश्वनाथ फुंदे खून प्रकरणातील चार संशयीत आरोपींना राहुरी तालुक्यात डोंगराच्या कपारीत पाठलाग करुन

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शेवगाव-पाथर्डीचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या पथकातील पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले.

सोमवारी चारही जण पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. सुधीर संभाजी शिरसाट (वय-२६ रा.आसरानगर पाथर्डी), आकाश पांडुरंग वारे (ग्रामपंचायत सदस्य माळीबाभुळगाव रा.शिक्षक काँलनी),

आकाश मोहन डुकरे (रा.विजयनगर, पाथर्डी) गणेश सोन्याबापु जाधव (रा.शंकरनगर, पाथर्डी)असे अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत.

राहुरी तालुक्यातील कानडगाव परिसरात डोंगराच्या भागात हे चौघेजण लपुन बसल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती.

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार सहाय्यक  पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, मनोहर गोसावी, विनोद मासाळकर, मेगराज कोल्हे, सचिन आडबल, विशाल दळवी, संतोष लोंधे, रोहीत येमुल, पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुंडे यांच्या पथकातील निलेश म्हस्के,

भगवान सानप, राहुल खेडकर यांनी कानडगावच्या डोंगरात रविवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान आरोपीचा शोध घेतला. चारही आरोपींना ताब्यात घेतले.

सोमवारी दुपारी नगरच्या पोलिसांनी चारही आरोपींना पाथर्डी पोलिस ठाण्यात आणले व तपाशी अधिकारी पोलिस निरीक्षक रणजीत डेरे यांच्या ताब्यात दिले.

आता या गुन्ह्यातील आणखी चार ते पाच संशयीतांची नावेही पोलिसासमोर येतील. गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस कर्मचारी व अधिकारी प्रयत्न करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24